फिनो (एफआयएनओ) पेमेंट्स बँक लिमिटेड कडून कामकाजाची सुरुवात |
जून 30, 2017
फिनो (एफआयएनओ) पेमेंट्स बँक लिमिटेड कडून कामकाजाची सुरुवात
जून 30, 2017 पासून फिनो (एफआयएनओ) पेमेंट्स बँक लिमिटेड ह्यांनी एक पेमेंट्स बँक म्हणून कामकाज सुरु केले आहे. भारतामध्ये एक पेमेंट्स बँक म्हणून व्यवहार करण्यासाठी, वरील बँकेला, रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 22 (1) खाली परवाना दिला आहे.
वृत्तपत्र निवेदन दि. ऑगस्ट 19, 2015 मध्ये घोषित केल्यानुसार, एक पेमेंट्स बँक स्थापन करण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आलेल्या 11 अर्जदारांपैकी, फिनो पे टेक लि., नवी मुंबई हेही एक अर्जदार होते.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3534 | |