जून 30, 2017
खाजगी क्षेत्रातील युनिव्हर्सल बँकांच्या ‘ऑन टॅप’ परवान्यांसाठीच्या मार्गदर्शक
तत्वांखाली, आरबीआयकडून अर्जदारांची नावे प्रकट
भारतीय रिझर्व बँकेने आज खाजगी क्षेत्रातील युनिव्हर्सल बँकांच्या ‘ऑन टॅप’ परवान्यांसाठीच्या मार्गदर्शक तत्वांखाली अर्जदारांची नावे प्रकट केली. आतापर्यंत, रिझर्व बँकेला, युएई एक्सचेंज अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ह्यांच्याकडून अर्ज मिळाला आहे.
येथे स्मरण व्हावे की, ऑगस्ट 1, 2016 रोजी दिलेल्या खाजगी क्षेत्रातील युनिव्हर्सल बँकांच्या ‘ऑन टॅप’ परवान्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये, सांगण्यात आले होते की, पारदर्शकता आणण्यासाठी, बँक-परवान्यांसाठीच्या अर्जदारांची नावे, आरबीआयच्या वेबसाईटवर नियतकालिकतेने प्रदर्शित केली जातील. त्यानुसार, ह्यापुढेही, अशा अर्जदारांची नावे तिमाही धर्तीवर प्रसिध्द करील.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2016-2017/3542 |