Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (104.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 04/07/2017
अमानाथ को.ऑपरेटिव बँक लि., बंगळुरु - बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35-अ खालील सर्वसमावेशक निदेशांना मुदतवाढ

जुलै 04, 2017

अमानाथ को.ऑपरेटिव बँक लि., बंगळुरु - बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (एएसीएस) च्या कलम 35-अ खालील सर्वसमावेशक निदेशांना मुदतवाढ

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, जनतेच्या हितासाठी तसे करणे आवश्यक असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले असल्याने, अमानाथ को.ऑपरेटिव बँक लि., बंगळुरु ह्यांना एप्रिल 1, 2013 रोजी दिलेल्या निदेशांना (व त्यानंतर देण्यात आलेल्या निदेशांसह वाचित - शेवटच्या निदेशाची तारीख डिसेंबर 29, 2016) रिझर्व बँकेने आणखी सहा महिने मुदतवाढ दिली आहे.

त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) च्या कलम 35-अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन येथे निदेश देत आहे की, अमानाथ को.ऑपरेटिव बँक लि., बंगळुरु ह्यांना देण्यात आलेल्या व वेळोवेळी सुधारित करण्यात आलेल्या, दि. एप्रिल 1, 2013 रोजीच्या निदेशांची (ज्यांची वैधता जुलै 4, 2017 पर्यंत वाढविण्यात आली होती) वैधता, आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे, जुलै 5, 2017 ते जानेवारी 4, 2018 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर वाढविण्यात आली आहे.

संदर्भित निदेशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

आरबीआयने हे निदेश दिले ह्याचा अर्थ, आरबीआयने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेतला जाऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत, ती बँक, निर्बंधांसहित बँकिंग-व्यवसाय करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून, ह्या निदेशांमध्ये बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/27

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä