जुलै 8, 2017
शुध्दिपत्र
भारतीय रिझर्व बँकेने जून 13, 2017 रोजी, संदर्भ क्र. 2016-2017/3363 (‘वृत्तपत्र निवेदन’) असलेले व ‘नादारी व दिवाळखोरी कोड (आयबीसी) खाली बँकांनी संदर्भित केलेली खाती आरबीआयकडून ओळखप्राप्त’ ह्या शीर्षकाचे एक वृत्तपत्र निवेदन दिले होते.
ह्या वृत्तपत्र निवेदनातील परिच्छेद 5 मधील तिसरी ओळ पुढीलप्रमाणे :
“5 ... नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल द्वारा (एनसीएलटी) अशा प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येईल” रद्द करण्यात आली आहे
वरील वृत्तपत्र निवेदनामधील उर्वरित मजकुरात कोणताही बदल झालेला नाही.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/78 |