Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (106.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 10/07/2017
दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल - बँकिंग विनियम अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ खाली दिलेल्या सर्वसमावेशक निदेशांना मुदतवाढ

जुलै 10, 2017

दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल - बँकिंग विनियम
अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ खाली
दिलेल्या सर्वसमावेशक निदेशांना मुदतवाढ

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल ह्यांना, डिसेंबर 30, 2016 रोजी दिलेल्या निदेशांसह वाचित, मार्च 28, 2014 रोजी दिलेल्या निदेशांना मुदतवाढ देणे, जनतेच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे.

त्यानुसार, बँकिंग विनियम अधिनियम, 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक निदेश देत आहे की, दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल ह्यांना मार्च 28, 2014 रोजी देण्यात आलेले वेळोवेळी सुधारित केलेले (निदेश दि. डिसेंबर 30, 2016 अन्वये, त्यांची वैधता जुलै 6, 2017 पर्यंत वाढविण्यात आलेले) निदेश, पुनरावलोकनाच्या अटीवर, जुलै 7, 2017 ते जानेवारी 6, 2018 पर्यंत म्हणजे आणखी सहा महिन्यांसाठी लागु असणे सुरुच राहील.

वेळोवेळी सुधारित केलेल्या वरील संदर्भित निदेशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.

आरबीआयने दिलेल्या वरील निदेशांचा अर्थ, वरील बँकेचा बँकिंग परवाना आरबीआयने रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक, निर्बधांसह बँक व्यवसाय करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशांमध्ये बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/89

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä