अंक फलकांमध्ये ‘s‘ हे इनसेट अक्षर आणि गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या, महात्मा गांधी मालिका, 2005 मधील रु.20/- च्या बँक नोटांचे वितरण |
जुलै 19, 2017
अंक फलकांमध्ये ‘s‘ हे इनसेट अक्षर आणि गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेल्या,
महात्मा गांधी मालिका, 2005 मधील रु.20/- च्या बँक नोटांचे वितरण
दोन्हीही अंक फलकांमध्ये ‘s‘ हे इनसेट अक्षर असलेल्या, महात्मा गांधी मालिकेमधील रु.20/- च्या नोटा, भारतीय रिझर्व बँक लवकरच प्रसृत करील.
ह्या नोटांचे डिझाईन सर्व बाबतीत, ह्याच मालिकेत ह्यापूर्वी दिलेल्या रु.20/- च्या बँक नोटांप्रमाणेच असेल (अधिक माहितीसाठी कृपया वृत्तपत्र निवेदन क्र.2016-2017/678 दि. सप्टेंबर 15, 2016 चा संदर्भ घ्यावा)
ह्या बँकेने ह्यापूर्वी दिलेल्या रु.20 च्या सर्व बँक नोटा वैध चलन असणे सुरुच राहील.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/183 | |