महाराष्ट्र राज्यामधील ग्रामीण व अर्ध ग्रामीण क्षेत्रातील त्यांच्या शाखा बँकांनी रविवार (जुलै 30, 2017) सुरु ठेवाव्यात |
जुलै 28, 2017
महाराष्ट्र राज्यामधील ग्रामीण व अर्ध ग्रामीण क्षेत्रातील त्यांच्या शाखा
बँकांनी रविवार (जुलै 30, 2017) सुरु ठेवाव्यात.
शेतक-यांकडून पिकांवरील विमा हप्ते गोळा करण्यास मदत व्हावी ह्यासाठी, प्रादेशिक ग्रामीण बँका व सहकारी बँकांसह सर्व बँकांना सांगण्यात येते की त्यांनी, ग्रामीण व अर्ध ग्रामीण क्षेत्रातील त्यांच्या शाखा रविवारी म्हणजे जुलै 30, 2017 रोजी सुरु ठेवाव्यात. एखाद्या बँक शाखेची साप्ताहिक रजा सोमवारी असल्यास, ती शाखा, सोमवार दि. 31 जुलै, 2017 रोजी सुरु असेल कारण पीक विमा हप्ता भरण्याची ती शेवटची तारीख आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/283 | |