जुलै 31, 2017
भारतीय रिझर्व बँकेकडून युनियन बँक ऑफ इंडियावर दंड लागु
जुलै 26, 2017 रोजी भारतीय रिझर्व बँकेने, युनियन बँक ऑफ इंडिया ह्यांना, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) निकषांबाबत रिझर्व बँकेने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याबाबत रु.10 दशलक्ष दंड लावला आहे. आरबीआयने दिलेल्या काही सूचनांचे, वरील बँकेने पालन न केल्यामुळे, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46 (4) (1) सह वाचित, कलम 47अ (1)(क) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने लावला आहे.
ही कारवाई, विनियामक पालनामधील त्रुटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेल्या एखाद्या व्यवहाराच्या वैधतेबाबत किंवा कराराबाबत वरील कारवाई करण्यात आलेली नाही.
पार्श्वभूमी
युनियन बँक ऑफ इंडियामधील काही विशिष्ट खात्यांमधून खूप मोठ्या रकमांची रोख निकासी होत असल्याबाबतची तक्रार रिझर्व बँकेकडे आली होती. ह्या संबंधित मिळालेल्या कागदपत्रांची तपासणी केल्यावर, आरबीआयने वरील बँकेला नोटिस पाठवून, आरबीआयने दिलेल्या सूचनांचे पालन केल्याने वरील बँकेला दंड का लावण्यात येऊ नये ह्याचे कारण देण्यास वरील बँकेस कळविण्यात आले होते.
ह्यावर वरील बँकेने दिलेले उत्तर आणि व्यक्तिगत सुनावणीमध्ये दिलेली सादरीकरणे, तसेच देण्यात आलेली अतिरिक्त कागदपत्रे व माहिती विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की रिझर्व बँकेच्या सूचनांचे पालन न केल्याबाबत केलेला वरील आरोप योग्य ठरत असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/295 |