Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (103.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 02/08/2017
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली निदेश - दि भोपाळ नागरिक सहकारी बँक लि., भोपाळ - वाढविलेला कालावधी

ऑगस्ट 02, 2017

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खाली निदेश - दि भोपाळ नागरिक सहकारी बँक लि., भोपाळ - वाढविलेला कालावधी

जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, भोपाळ नागरिक सहकारी बँक लि., भोपाळ (मध्यप्रदेश) ह्यांना दिलेल्या, जानेवारी 25, 2017 च्या निदेशासह वाचित, ऑक्टोबर 29, 2012 रोजी दिलेल्या निदेशाचा कार्यकारी काल, जुलै 31, 2017 पर्यंत वाढविणे, जनतेच्या हितासाठी आवश्यक असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे. त्यानुसार, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 56 सह वाचित, कलम 35अ च्या पोट कलम (1) ने तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक निदेश देत आहे की, भोपाळ नागरिक सहकारी बँक लि., भोपाळ (एमपी) ह्यांना, ऑक्टोबर 29, 2012 रोजी देण्यात आलेले निदेश (ज्यांची वैधता शेवटून जुलै 31, 2017 पर्यंत वाढविण्यात आली होती) वरील बँकेला, आणखी सहा महिन्यांसाठी (ऑगस्ट 1, 2017 ते जानेवारी 31, 2018 पर्यंत), जुलै 25, 2017 च्या निदेशांन्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर लागु असणे सुरुच राहील. संबंधित जनतेच्या माहितीसाठी वरील निदेशांच्या प्रती, बँकेच्या कार्यालयात लावण्यात आल्या आहेत.

आरबीआयने हे निदेश दिले ह्याचा अर्थ, आरबीआयने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा लावण्यात येऊ नये. पुढील अवलोकन करीपर्यंत वरील बँक, बँक-व्यवसाय निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निदेशांमध्ये बदल करण्याचा विचार आरबीआय करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/318

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä