ऑगस्ट 2, 2017
तिरुमला को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना दंड लागु
बँकिंग विनियात्मक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(ब) खालील तरतुदींनी तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, तिरुमला को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना रु.2.00 लाख (रुपये दोन लाख) दंड लावला आहे. हा दंड, रिझर्व बँकेने पुढील निकषांवर दिलेल्या निदेशांचे व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करण्याबाबत लावण्यात आला आहे.
(1) संचालक व त्यांच्या नातेवाईकांना दिलेली कर्जे
(2) एक्सपोझर नॉर्म्स व वैधानिक/इतर निर्बंध
(3) युसीबीच्या नफ्यामधून सार्वजनिक/धर्मार्थ कामांसाठी देणग्या/वर्गणी.
रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती. त्यावर वरील बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य व बँकेने दिलेले उत्तर आणि वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की ही उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/331 |