ऑगस्ट 18, 2017
महात्मा गांधी मालिकेमधील (नवीन) रु.50 ची बँक नोट आरबीआयकडून प्रसृत
भारतीय रिझर्व बँक लवकरच, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेली, महात्मा गांधी मालिकेमधील (नवी) बँक नोट प्रसृत करणार आहे. ह्या नवीन नोटेच्या मागच्या बाजूस देशाचा सांस्कृतिक वारसा दर्शविणारे, रथासह हंपीचे चित्र असेल. ह्या नोटेचा मूळ/पार्श्व रंग फ्ल्युरोसंट निळा असेल. ह्या नोटेच्या दर्शनी व मागच्या बाजूवरही, एकंदर रंग योजनेशी मेळ असणारी इतर डिझाईन्स व भौमितिक आकृती असतील.
भारतीय रिझर्व बँकेने ह्यापूर्वीच्या मालिकांमध्ये दिलेल्या रु.50 च्या नोटाही, वैध चलन असणे सुरु राहील.
महात्मा गांधी मालिकेतील (नवी) ह्या रु.50 च्या बँक नोटेची प्रतिमा व मुख्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.
(1) प्रतिमा
(2) मुख्य लक्षणे (दर्शनी बाजू)
(1) 50 हे मूल्य असलेले आरपार दिसणारे रजिस्टर
(2) मूल्य दर्शविणारा 50 हा अंक देवनागरीत
(3) मध्यभागी महात्मा गांधीचे चित्र
(4) ‘RBI’, भारत, ‘INDIA’व ‘50’ हे सूक्ष्म अक्षरात
(5) ‘भारत’ व RBI हे शब्द असलेला खिडकीयुक्त डिमेटॅलाईज्ड सुरक्षा धागा
(6) हमी, हमी खंडासह गव्हर्नरांची सही आणि महात्मा गांधींच्या उजवीकडे आरबीआयचे चिन्ह/मुद्रा
(7) उजवीकडे अशोक स्तंभाचे चिन्ह
(8) महात्मा गांधींचे चित्र व इलेक्ट्रोटाईप (50) वॉटर मार्क्स
(9) वरच्या बाजूस डावीकडे व खालच्या बाजूस उजवीकडे, मोठे होत जाणारे अंक असलेले अंक फलक.
मागील (पाठची) बाजू
(10) छपाईचे वर्ष नोटेच्या डाव्या बाजूस
(11) घोषणेसह स्वच्छ भारत लोगो
(12) भाषा फलक
(13) रथासह हंपीचे चित्र
(14) मूल्य दर्शविणारे अंक 50 देवनागरीत.
ह्या नोटेचा आकार 66 मिमी x 135 मिमी असेल.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/481 |