29 सप्टेंबर 2017
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्), कलम 35अ अंतर्गत निर्देश कालावधी विस्तार-
कपोल को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र
भारतीय रिझर्व्ह बँकेने दिनांक 30 मार्च 2017 रोजी दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगाने कपोल को-ऑपरेटिव बँक लि., मुंबई, महाराष्ट्र वर दिनांक 30 मार्च 2017 ची कार्यालयीन वेळ संपल्यापासून दिशानिर्देश लादण्यात आले होते.
जनतेच्या माहितीसाठी सुचना देण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व्ह बँक, द्वारे बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 कलम 56 चे वाचन करीता, कलम 35अ, उप कलम (1) अनुसार, आपल्या प्रदत्त अधिकाराचा वापर करून असा आदेश देत आहे की उपरोक्त दिनांक 30 मार्च 2017 रोजी दिलेल्या निर्देश हा सुधारित निर्देश द्वारा 31 मार्च, 2018 पर्यंत सहा महिन्यासाठी वाढवला आहे, त्याची सूचना दिनांक 25 सप्टेंबर 2017 रोजीच्या सूधारीत निर्देशा नुसार दिलेली आहे जी बँकेच्या आर्थिक आढाव्यावर पुनरावलोकनाधीन असेल.
दिनांक 25 सप्टेंबर, 2017 च्या सुधारित निर्देशाची प्रत बँकेच्या जागेत जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या उपरोक्त मुदत वाढीमुळे आणि/किंवा निर्देशातील परिवर्तनामुळे जनतेने असे गृहीत धरू नये की, बँकेच्या सुधारलेल्या आर्थिक स्थितीवर भारतीय रिझर्व्ह बँक समाधानी आहे.
अजीत प्रसाद
सहायक परामर्शदाता
प्रेस प्रकाशनी: 2017-2018/895 |