ऑक्टोबर 03, 2017
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली दिलेले निदेश - श्री. गणेश सहकारी बँक
लि. नाशिक, महाराष्ट्र - ह्यांना मुदतवाढ
एप्रिल 1, 2013 रोजीच्या निदेशान्वये, श्री. गणेश सहकारी बँक लि., नाशिक, महाराष्ट्र ह्यांना एप्रिल 2, 2013 चे व्यवहार संपल्यानंतर निदेशांखाली ठेवण्यात आले होते. ह्या निदेशांची वैधता वेळोवेळी देण्यात आलेल्या निदेशांनी (शेवटचे निदेश दि. मार्च 24, 2017) सप्टेंबर 29, 2017 पर्यंत पुनरावलोकनाच्या अटीवर वाढविण्यात आली होती.
जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँक येथे निदेश देते की, वरील बँकेला, एप्रिल 1, 2013 रोजी दिलेले व वेळोवेळी सुधारित केलेले व सप्टेंबर 29, 2017 पर्यंत वैधता वाढविलेले निदेश, सप्टेंबर 30, 2017 ते मार्च 29, 2018 पर्यंत (आणखी सहा महिन्यांसाठी) पुनरावलोकनाच्या अटीवर, सप्टेंबर 25, 2017 रोजी दिलेल्या निदेशांन्वये लागु असणे सुरुच राहील.
सप्टेंबर 25, 2017 च्या निदेशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावली आहे.
रिझर्व बँकेने दिलेल्या वरील मुदतवाढीचा आणि/किंवा बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/910 |