भावना रिशी कोऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना आर्थिक दंड लागु |
ऑक्टोबर 10, 2017
भावना रिशी कोऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना आर्थिक दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित, कलम 47अ(1)(ब) ने तिला दिलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँकेने, भावना रिशी कोऑपरेटिव अर्बन बँक लि., हैद्राबाद, तेलंगणा ह्यांना रु.1.00 लाख (रुपये एक लाख) दंड लावला असून, हा दंड, संचालक व त्यांचे नातेवाईक ह्यांना द्यावयाची कर्जे व अग्रिम राशींवरील रिझर्व बँकेने दिलेल्या निदेशांचे व मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्यामुळे लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस दिली होती आणि वरील बँकेने त्यावर लेखी उतरही दिले होते. ह्या प्रकरणातील सत्य आणि वरील बँकेने दिलेले उत्तर व व्यक्तिगत सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने प्रत्यक्षात झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/980 |
|