ऑक्टोबर 12, 2017
मे. रेलिगेअर फिनवेस्ट लि. ह्यांना आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 (आरबीआय अधिनियम 1934) च्या कलम 58बी च्या पोटकलम (5) च्या खंड (अ अ) सह वाचित, कलम 58जी च्या पोटकलम (1) च्या खंड (ब) खाली, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय), मे. रेलिगेअर फिनवेस्ट लि. (ही कंपनी) ह्यांना रु.20.00 लाख दंड लागु केला आहे. आणि हा दंड आरबीआयने वेळोवेळी दिलेल्या निदेशांचे/आदेशांचे पालन न केल्याबाबत लावण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
सप्टेंबर - ऑक्टोबर 2015 च्या दरम्यान आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45एन खाली वरील कंपनीची तपासणी करण्यात आली होती. ह्या तपासणी दरम्यान दिसून आले की, असाईनमेंट व्यवहाराबाबत आरबीआयने दिलेल्या निरनिराळ्या निदेशांचे/आदेशांचे ह्या कंपनीने पालन केलेले नाही. दंड लावण्यासाठी, ह्या कंपनीला नोव्हेंबर 7, 2016 रोजी एक कारणे दाखवा नोटिस (एससीएम) देण्यात आली होती. ह्या बाबत वरील कंपनीने दिलेले उत्तर समाधानकारक नव्हते. आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 58 जी च्या पोटकलम (2) खाली ह्या कंपनीला जुलै 10, 2017 रोजी वैय्यक्तिक सुनावणीसाठीही पाचारण करण्यात आले होते. ह्या प्रकरणातील सर्व ख-या गोष्टी, कंपनीने दिलेले उत्तर आणि वैय्यक्तिक सुनावणीत केलेले सादरीकरण विचारात घेऊन आरबीआयने निष्कर्ष काढला की, तपासणी दरम्यान मिळालेली उल्लंघने प्रत्यक्षात झाली असून त्यासाठी ह्या कंपनीला आर्थिक दंड करणे आवश्यक आहे. त्यानुसार ह्या कंपनीला रु.20 लाखांचा दंड लावण्यात आला आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1014 |