ऑक्टोबर 16, 2017
बँकिंग हिंदीच्या क्षेत्रातील विशेष लेखांसाठी पारितोषिक
बँकिंग हिंदीमधील मूलभूत लेख व संशोधन ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेने ‘बँकिंग हिंदी क्षेत्रातील विशेष लेखांसाठी पारितोषिक योजना’ सुरु केली आहे. ह्या योजनेखाली, भारतीय विश्वविद्यालयांतील प्रोफेसर्सना (सहाय्यक व संगत इत्यादिसह) मूलतः अर्थशास्त्र/बँकिंग/वित्तीय विषयांवर हिंदी भाषेत पुस्तके लिहिण्यासाठी प्रत्येकी रु.1,25,000/- (रुपये एक लाख पंचवीस हजार) ची तीन पारितोषिके देण्यात येतील. ह्या योजनेचा तपशील जोडपत्रात दिला आहे. ह्या योजनेत भाग घेऊ इच्छिणा-या सर्व प्रोफेसरांना सांगण्यात येते की त्यांनी त्यांची नोंदणी, विहित केलेल्या नमुन्यात, डिसेंबर 15, 2017 च्या संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी, प्रभारी उप-महाव्यवस्थापक, भारतीय रिझर्व बँक, राजभाषा विभाग, केंद्रीय कार्यालय, सी-9, 2 रा मजला, बांद्रा कुर्ला काँप्लेक्स, मुंबई - 400051 ह्यांचेकडे सादर करावी.
शैलजा सिंग
सहाय्यक महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1050 |