ऑक्टोबर 21, 2017
बँक खात्यांशी आधारची जोडणी अपरिहार्य असल्याबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण
एका माध्यम-क्षेत्रामध्ये बातमी देण्यात आली होती की, एका माहितीचा अधिकार अर्जाच्या उत्तरानुसार बँक खात्याशी आधार क्रमांकांची जोडणी करणे अपरिहार्य नाही.
रिझर्व बँक येथे स्पष्ट करत आहे की, लागु असलेल्या प्रकरणांमध्ये, जून 1, 2017 रोजीच्या कार्यालयीन राजपत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या, प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग (मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड्स) सेकंड अॅमेंडमेंट रुल्स, 2017 खाली, बँक खात्याशी आधार क्रमांकाची जोडणी करणे अनिवार्य आहे.
ह्या नियमावलींना वैधानिक बल/अधिकार असल्याने, पुढील सूचनांची वाट न पाहता बँकांनी त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
जोस जे कत्तूर मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1089
SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä