ईशान्य लघु वित्त बँक लि. कडून व्यवहारांचा प्रारंभ |
ऑक्टोबर 17, 2017
ईशान्य लघु वित्त बँक लि. कडून व्यवहारांचा प्रारंभ
ऑक्टोबर 17, 2017 पासून, ईशान्य लघु वित्त बँक लि. कडून, एक लघु वित्त बँक म्हणून व्यवहार करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 22 (1) खाली, भारतामध्ये एक लघु वित्त बँक म्हणून व्यवसाय करण्यास परवाना दिला आहे.
सप्टेंबर 16, 2015 रोजी दिलेल्या वृत्तपत्र निवेदनात घोषित केल्यानुसार, एक लघु वित्त बँक स्थापन करण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आलेल्या दहा अर्जदारांमध्ये, आरजीव्हीएन (ईशान्य) मायक्रो फायनान्स लिमिटेड, गुवाहाटी हे होते.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1069 |
|