Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (96.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 20/10/2017
सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-18 मालिका 5 - देण्याची किंमत/मूल्य

ऑक्टोबर 20, 2017

सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-18 मालिका 5 - देण्याची किंमत/मूल्य

भारत सरकारची अधिसूचना एफ क्र. 4(25) – बी/(डब्ल्यु अँड एम)/2017 आणि आरबीआयचे परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.929/14.04.050/2017-18 दि. ऑक्टोबर 6, 2017 अन्वये, ऑक्टोबर 9, 2017 ते डिसेंबर 27, 2017 ह्या दरम्यान, प्रत्येक आठवड्याच्या सोमवार ते बुधवार ह्या दरम्यान ही सार्वभौम सुवर्ण रोखे योजना, वर्गणीसाठी खुली असेल. एखाद्या दिलेल्या आठवड्यात मिळालेल्या अर्जांसाठी, ह्याचे समायोजन, पुढील आठवड्याच्या व्यवहाराच्या पहिल्या दिवशी केले जाईल.

ऑक्टोबर 30, 2017 ह्या समायोजनाच्या दिवसासह, ऑक्टोबर 23, 2017 ते ऑक्टोबर 25, 2017 ह्या कालावधीतील वर्गणीसाठी, वर्गणी-कालाच्या पूर्वीच्या आठवड्यातील शेवटच्या तीन व्यवहारांच्या दिवशी (म्हणजे ऑक्टोबर 17, 18 आणि 20, 2017) 999 शुध्दतेच्या सोन्याच्या सरासरी बंद किंमतीवर आधारित (इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन लि. (आयबीजेए) ह्यांनी प्रसिध्द केलेली) ह्या रोख्याची नाममात्र किंमत, प्रति ग्राम, रु.2,971/- (रुपये दोन हजार नऊशे एकाहत्तर) एवढी आहे.

भारतीय रिझर्व बँकेशी सल्लामसलत करुन, भारत सरकारने, ऑनलाईन अर्ज करणारांसाठी, व त्या अर्जाबाबतचे प्रदान डिजिटल पध्दतीने केल्यास, नाममात्र किंमतीत प्रति ग्राम रु.50/- सूट/सवलत देण्याचे ठरविले आहे. अशा गुंतवणुकदारांसाठी, सुवर्ण रोख्याची किंमत, सोन्याच्या प्रति ग्रामसाठी, रु.2,921/- (रुपये दोन हजार नऊशे एकवीस) असेल.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1088

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä