नोव्हेंबर 3, 2017
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35 अ च्या, पोटकलम (2) खालील सूचना/निदेश मागे घेणे - नाशिक डिस्ट्रिक्ट गिरणा सहकारी बँक लि. नाशिक, जिल्हा-नाशिक, महाराष्ट्र भारतीय रिझर्व बँकेने, नोव्हेंबर 2, 2017 रोजीपासून, नाशिक डिस्ट्रिक्ट गिरणा बँक लि., नाशिक, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र ह्यांना आदेश दि. सप्टेंबर 8, 2015 अन्वये देण्यात आलेले सर्वसमावेशक निदेश मागे घेतले आहेत.
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 35अ च्या, पोटकलम (2) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन रिझर्व बँकेने हे निदेश मागे घेतले आहेत. संबंधित व्यक्तींच्या माहितीसाठी, नोव्हेंबर 1, 2017 च्या वरील आदेशाची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे. ह्यानंतर वरील बँक जिचे नियमित बँक व्यवहार करणे सुरु ठेवू शकते.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1222 |