Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (95.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 09/11/2017
सुनो आरबीआय क्या कहता है - आरबीआयचा जन-जागृतीसाठीचा पुढाकार

नोव्हेंबर 9, 2017

सुनो आरबीआय क्या कहता है - आरबीआयचा जन-जागृतीसाठीचा पुढाकार

भारतीय रिझर्व बँक - भारताची केंद्रीय बँक - लवकरच, निरनिराळे बँकिंग विनियम व उपलब्ध असलेल्या सुविधा ह्याबाबत जनतेला ज्ञान/शिक्षण देण्यासाठी, एसएमएसद्वारे एक जन-जागृती मोहिम सुरु करणार आहे.

सुरुवातीला, रिझर्व बँक संदेश पाठवून, ई-मेल/एसएमएस/फोन कॉल्स मधून मिळालेल्या, मागणी न करताही दिल्या जाणा-या व खोट्या ऑफर्सना बळी न पडण्याबाबत जनतेला सावधानतेचे इशारे देईल. ‘आरबीआयसे’ ह्या सेंडर आयडीकडून हे सावधानतेचे इशारे पाठविले जातील.

वेळोवेळी देण्यात आलेल्या वृत्तपत्र निवेदनांद्वारे, (https://www.rbi.org.in/commonman/Marathi/scripts/rbicautions.aspx) अशा ऑफर्स विरुध्दचे सावधानतेचे इशारे रिझर्व बँक देत आली आहे. फसवणुक करणा-या अशा लोकांकडून वापरण्यात येणा-या माध्यमांचा (एसएमएस व ई-मेल) उपयोग करण्याची आरबीआयची ही पहिलीच वेळ आहे. चिट फंडमध्ये शहाणपणाने व सावधानतेने गुंतवणुक करण्यासह, खोट्या फोन कॉल्स/ई-मेल्सवर इंटरेक्टिव व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टिमद्वारे (आयव्हीआरएस) अधिक माहिती मिळविण्यासाठी, जनता 8691960000 ला एक मिस्ड कॉल देऊ शकते. ह्या मोहिमेबाबत त्यांचा फीड बॅक ई-मेलनेही पाठविता येईल.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1282

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä