नोव्हेंबर 09, 2017
बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (सहकारी सोसायटीना यथालागू), कलम 35अ अंतर्गत निदेश
कराड जनता सहकारी बँक लि. कराड, जि. सातारा, महाराष्ट्र
याद्वारे जनतेच्या माहितीसाठी हे अधिसूचित करण्यात येत आहे की, भारतीय रिझर्व बँकेने बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 (एएसीएस्) च्या कलम 35अ उपकलम (1), बँकिंग विनियमन अधिनियम, 1949 च्या कलम 56 सह वाचता त्या अन्वये आपणाकडील निहित अधिकारांचा वापर करून काही निर्देश, कराड जनता सहाकारी बँक लि., मुबंई, महाराष्ट्र, या बॅकेला दिलेले आहेत, ज्यायोगे नोवेंबर 09, 2017 रोजी कामकाज संपल्यापासून वरील बँक, भारतीय रिझर्व बँकेच्या लेखी परवानगीशिवाय, कोणत्याही कर्जाचे आणि अग्रिम रकमांचे पुर्ननवीकरण करणार नाही, कोणतीही गुंतवणूक करणार नाही, निधी उसने घेणे आणि नव्या ठेवी स्वीकारणे यासहित कोणतीही देयता निर्माण करणार नाही, देयता किंवा बंधन निभावण्यासाठी किंवा अन्यथा, कोणतीही प्रदाने वितरित करणार नाही किंवा वितरित करण्याचे मान्य करणार नाही किंवा कसल्याही तडजोडीत किंवा व्यवस्थेत प्रविष्ट होणार नाही किंवा ज्यांची प्रत जनतेतील इच्छुकांना पाहण्यासाठी बँकेच्या वास्तूवर लावण्यात आलेली आहे अशा दि. नोवेंबर 07, 2017 च्या भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांमध्ये अधिसूचित केल्यानुसार असल्याखेरीज आपल्या कोणत्याही म़ालमत्तांची किंवा मत्तांची विक्री, हस्तांतरण किंवा अन्यप्रकारे विल्हेवाट लावणार नाही.
विशेषत: प्रत्येक बचत खाते, चालू खाते किंवा इतर ठेवीचे कोणतेही खाते अशा सर्व खात्यांमधून जमा असलेल्या एकूण शिलकींपैकी रू. 1000/- (रूपये एक हजार फक्त) पेक्षा जास्त नसलेली रककम उपरोक्त भारतीय रिझर्व बँकेच्या निर्देशांमध्ये नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून काढता येईल.
भारतीय रिझर्व बँक व्दारा निर्गमित वरील निर्देश म्हणजे भारतीय रिझर्व बँकेने बँकिंग परवाना रद्द केला आहे, असा त्यांचा अर्थ घेतला जाऊ नये. आपली वित्तीय स्थिती सुधारेपर्यंत बँक या निर्बंधांसहित आपला बँकिंग व्यवसाय करणे सुरुच ठेवील. परिस्थितीनुसार या निर्देशांमध्ये बदल करण्याचा विचार भारतीय रिझर्व बँक करील.
अजीत प्रसाद
सहायक परामर्शदाता
प्रेस प्रकाशनी: 2017-2018/1292 |