नोव्हेंबर 3, 2017
सार्वभौम सुवर्ण रोखे 2017-2018, मालिका 7 - प्रचालन मूल्य जीओआय अधिसूचना एफ.क्र.4(25)-बी/(डब्ल्यु अँड एम)/2017 आणि आरबीआय परिपत्रक आयडीएमडी.सीडीडी.क्र.929/14.04.050/2017-18 दि. ऑक्टोबर 6, 2017 अनुसार, ऑक्टोबर 9, 2017 पासून ते डिसेंबर 27, 2017 पर्यंत, प्रत्येक आठवड्याच्या सोमवारपासून ते बुधवार पर्यंत, सार्वभौम सुवर्ण रोखे योजना, वर्गणीसाठी (सबस्क्रिप्शन) खुली असेल. एखाद्या दिलेल्या आठवड्यात मिळालेल्या अर्जांसाठी, त्याबाबतचे समायोजन, पुढील आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी केले जाईल.
नोव्हेंबर 13, 2017 रोजीच्या समायोजनासह, नोव्हेंबर 6, 2017 ते नोव्हेंबर 8, 2017 ह्या वर्गणी कालावधीसाठी, वर्गणी कालावधीच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या तीन दिवसांच्या, 999 शुध्दतेच्या सोन्याच्या, बंद किंमतीच्या (इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लि. (आयबीजेए) ने प्रसिध्द केलेल्या) साध्या सरासरी मूल्याच्या आधाराने ह्या रोख्याचे नाममात्र मूल्य, प्रति ग्राम रु.2,934/- (रुपये दोन हजार नऊशे चौतीस) असेल.
भारतीय रिझर्व बँकेंशी सल्लामसलत करुन भारत सरकारने, ऑन लाईन अर्ज करुन, त्या अर्जासाठीचे प्रदान डिजिटल रितीने करणा-या गुंतवणुकदारांसाठी, नाममात्र मूल्यापेक्षा, प्रति ग्राम रु.50 सूट/सवलत देण्याचे ठरविले आहे. अशा गुंतवणुकदारांसाठी, सुवर्ण रोख्याची प्रचालन किंमत प्रति ग्राम रु.2,884/- (रुपये दोन हजार आठशे चौ-यांशी) असेल.
अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1237 |