Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (94.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 29/11/2017
आपल्या नावात ‘बँक’हा शब्द वापरणा-या निरनिराळ्या सोसायट्यांविरुध्द सावधानतेचा इशारा

नोव्हेंबर 29, 2017

आपल्या नावात ‘बँक’हा शब्द वापरणा-या निरनिराळ्या सोसायट्यांविरुध्द सावधानतेचा इशारा

भारतीय रिझर्व बँकेच्या (आरबीआय) नजरेस आले आहे की, काही सहकारी सोसायट्या त्यांच्या नावात ‘बँक’हा शब्द वापरत आहेत. असे करणे हे, बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) (बीआर अधिनियम 1949) कलम 7 चे उल्लंघन आहे.

आरबीआयच्या असेही नजरेस आले आहे की, काही सहकारी सोसायट्या, सभासद नसलेल्या/नाममात्र सभासद असलेल्या/सहाय्यक सभासद असलेल्या व्यक्तींकडून ठेवी स्वीकारत असून, ते बीआर अधिनियम 1949 च्या तरतुदींचे उल्लंघन आहे.

येथे जनतेला सांगण्यात येते की, अशा सोसायट्यांना बीआर अधिनियम 1949 खाली कोणताही परवाना देण्यात आला नाही आणि बँकिंग व्यवसाय करण्यास त्यांना आरबीआयकडून प्राधिकृतही करण्यात आलेले नाही. अशा सोसायट्यांमध्ये ठेवलेल्या ठेवींना, डिपॉझिट इन्शुअरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (डीआयसीजीसी) कडून विमा संरक्षण उपलब्ध नाही. अशा सहकारी सोसायट्यांबरोबर व्यवहार करताना सावधानता बाळगून पूर्ण चौकशी करण्यास जनतेला सांगण्यात येत आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1467

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä