डिसेंबर 11, 2017
दि ए पी महाजन्स को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु बँकिंग विनियामक अधिनियम, 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित, कलम 47अ(1)(ब) च्या तरतुदींखाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि ए पी महाजन्स को-ऑपरेटिव अर्बन बँक लि. हैद्राबाद, तेलंगणा ह्यांचेवर रु.0.50 लाख(रुपये पन्नास हजार मात्र) दंड लागु केला असून, हा दंड, एक्सपोझर नॉर्म्स व वैधानिक/इतर निर्बंध ह्यावरील रिझर्व बँकेने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केल्याबाबत लावण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती आणि त्या बँकेने लेखी उत्तर दिले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निर्णय घेतला की उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1592 |