डिसेंबर 13, 2017
इंडसइंड बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
डिसेंबर 12, 2017 रोजी भारतीय रिझर्व बँकेने, इंडसइंड बँक लि. (बँक) ह्यांना रु.30 दशलक्ष आर्थिक दंड लागु केला असून, तो दंड, उत्प्न्न-ओळख व अॅसेट वर्गीकरण (आयआरएसी) वरील आरबीआयने दिलेल्या नॉर्म्सचे पालन न करणे, आणि निधी आधारित नसलेल्या सुविधांबाबत (एनएफबी) असलेल्या विनियामक निर्बंधांचे उल्लंघन करणे ह्यासाठी लागु करण्यात आला आहे. आरबीआयने दिलेल्या काही निर्देश/मार्गदर्शक तत्वांचे, त्या बँकेने अनुपालन न केल्याने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या, कलम 46 (4)(1) सह वाचित, कलम 47 (अ)(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने हा दंड लावला आहे.
ही कारवाई, विनियामक अनुपालनामधील त्रुटींवर आधारित असून, त्या बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्याशी संबंधित नाही.
पार्श्वभूमी
मार्च 31, 2016 रोजी असलेल्या त्या बँकेच्या वित्तीय स्थितीच्या संदर्भात केलेल्या तपासणीत, इतर बाबींबरोबर, अकार्यकारी अॅसेट्सचे (एनपीए) मूल्यांकन व एनएफबी सुविधांना मुदतवाढ देणे ह्याबाबत आरबीआयने दिलेल्या निरनिराळ्या विनियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. निरीक्षण/तपासणी अहवाल आणि इतर संबंधित कागदपत्रांच्या आधारावर, आरबीआयने दिलेल्या सूचनांचे अनुपालन न केल्यासाठी त्या बँकेला दंड का लावण्यात येऊ नये ह्याबाबत कारणे देण्यासाठी, ऑगस्ट 10, 2017 रोजी, त्या बँकेला नोटिस देण्यात आली होती. त्यावर त्या बँकेने दिलेले उत्तर, वैय्यक्तिक सुनावणी केलेली सादरीकरणे आणि सादर केलेली अतिरिक्त माहिती विचारात घेऊन आरबीआयने निर्णय घेतला की, आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे/मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याचा वरील आरोप सत्य असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1617 |