डिसेंबर 21, 2017
प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांचा दृष्टिकोन 2016-17
भारतीय रिझर्व बँकेने आज, ‘प्राथमिक (अर्बन) को-ऑपरेटिव बँक्स आऊटलुक 2016-17’ ह्या शीर्षकाच्या (चौथा खंड) वार्षिकाचे पुस्तक वितरित केले आहे. हे पुस्तक https://dbie.rbi.org.in/DBIE/dbie.rbi?site=publications वर अॅक्सेस करता येऊ शकते. हे प्रकाशन, भारतीय रिझर्व बँकेच्या ‘सहकारी बँका पर्यवेक्षण विभागाने’ प्रकाशित केले आहे.
ह्या पुस्तकात, वित्तीय वर्ष 2016-17 साठीच्या, अनुसूचित व नॉन-अनुसूचित प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांच्या वित्तीय लेखा समाविष्ट केल्या आहेत. ह्या पुस्तकात, ताळेबंदाच्या महत्वाच्या बाबी, नफा-तोटा लेखा, अकार्यकारी अॅसेट्स, वित्तीय गुणोत्तरे, राज्यनिहाय कार्यालये, आणि प्राधान्य क्षेत्रातील अग्रिम राशींचा तपशील अशी विविध माहिती एकत्रित करण्यात आली आहे. ह्याशिवाय ह्या पुस्तकात, अनुसूचित प्राथमिक (नागरी) सहकारी बँकांच्या कॅपिटल अॅडेक्वसी वरील निवडक वित्तीय गुणोत्तरे, लाभक्षमता आणि कर्मचा-यांची उत्पादनक्षमता ह्यावरील बँक निहाय माहिती दिली आहे. हे प्रकाशन केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरुपात, वार्षिक धर्तीवर, भारतीय रिझर्व बँकेच्या वेबसाईट वरील https://dbie.rbi.org.in/ भारतीय अर्थशास्त्राचा डेटाबेस (डीबीआयई) या लिंक मार्फतच देण्यात आले आहे. ह्या पुस्तकाच्या कोणत्याही हार्ड कॉपीज नसतील.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1712 |