Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (131.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 05/01/2018
आरबीआयकडून, महात्मा गांधी (नवी) मालिकेमधील रु. 10 ची बँक नोट प्रसृत

जानेवारी 5, 2018

आरबीआयकडून, महात्मा गांधी (नवी) मालिकेमधील रु. 10 ची बँक नोट प्रसृत

भारतीय रिझर्व बँक लवकरच, भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित आर पटेल ह्यांची सही असलेली, महात्मा गांधी (नवी) मालिकेतील रु.10 ची बँक नोट प्रसृत करणार आहे. ह्या नोटेच्या मागील बाजूवर, देशाचा सांस्कृतिक वारसा दर्शविणारे कोणार्क येथील सूर्य मंदिराचे चिन्ह असेल. ह्या नोटेचा पार्श्व रंग चॉकलेटी ब्राऊन असेल. ह्या नोटेच्या दर्शनी तसेच मागच्याही बाजूवर, सर्वकंष रंगसंगतीशी मेळ असणारी इतर डिझाइन्स व भौमितीक आकृती असतील.

रिझर्व बँकेने ह्यापूर्वी दिलेल्या मालिकांमधील रु.10 च्या सर्व बँक नोटा, वैध चलन असणे सुरुच राहील.

महात्मा गांधी (नवीन) मालिकेतील रु.10 च्या बँक नोटांची प्रतिमा व प्रमुख लक्षणे खाली दिल्यानुसार आहेत.

(1) प्रतिमा


(2) प्रमुख लक्षणे

पुढील (दर्शनी) बाजू

(1) 10 हे मूल्य दर्शविणा-या अंकासह सी-थ्रु रजिस्टर
(2) १० हा मूल्य दर्शविणारा अंक देवनागरी मध्ये
(3) मध्यभागी महात्मा गांधीचे चित्र
(4) RBI, भारत, INDIA व 10 हे सूक्ष्म अक्षरात.
(5) भारत व RBI हे शब्द असलेला, खिडकीयुक्त, डिमेटेलाइज्ड सुरक्षा धागा.
(6) महात्मा गांधींच्या चित्राच्या उजव्या बाजूस गॅरंटी क्लॉज, प्रॉमिज क्लॉजसह गव्हर्नरची सही आणि आरबीआयचे बोध चिन्ह.
(7) उजव्या बाजूस अशोक स्तंभाचे चिन्ह.
(8) महात्मा गांधींचे चित्र व इलेक्ट्रॉटाईप (10) वॉटरमार्क्स.
(9) सर्वात वरच्या डाव्या बाजूवर व तळावरील उजव्या बाजूस, वाढत्या आकाराचे अंक असलेले अंक फलक.

पार्श्व (मागील) बाजू

(10) नोटेच्या छपाईचे वर्ष डाव्या बाजूस.
(11) घोषणेसह स्वच्छ भारत लोगो.
(12) भाषा फलक
(13) कोणार्कच्या सूर्य मंदिराचे चित्र.
(14) मूल्यदर्श १० हा अंक देवनागरीमध्ये.

ह्या नोटेचा आकार 63 मिमी X 123 मिमी असेल.

जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1848

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä