Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (103.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 10/01/2018
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली दिलेले निर्देश - गोमती नागरीय सहकारी बँक लि., जौनपुर (उत्तर प्रदेश)

जानेवारी 10, 2018

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खाली दिलेले निर्देश - गोमती नागरीय सहकारी बँक लि., जौनपुर (उत्तर प्रदेश)

भारतीय रिझर्व बँकेने अधिसूचित केले आहे की, तिच्या निर्देशात केलेला अंशतः बदल म्हणून, जुलै 3, 2017 रोजी तिने दिलेल्या निर्देशान्वये गोमती नागरीय सहकारी बँक लि., जौनपुर (उत्तर प्रदेश) ह्यांच्यावर लागु केलेल्या सूचना शिथील केल्या आहेत. सुधारित निर्देशात दिलेल्या अटी व शर्तींवर आता रु.30,000 (रुपये तीस हजार) पर्यंतच्या रकमेची निकासी करण्यास परवानगी आहे. जुलै 3, 2017 रोजी देण्यात आलेल्या निर्देशामधील इतर अटी व शर्तींमध्ये मात्र कोणताही बदल केलेला नाही. त्याचप्रमाणे, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) कलम 35अ खाली, जुलै 10, 2017 रोजीच्या व्यवहार बंद झाल्यापासून निर्देशांखाली आहे. निर्देश दि. जानेवारी 8, 2018 अन्वये, ह्या निर्देशांची वैधता जुलै 10, 2018 पर्यंत वाढविण्यात आली आहे. जानेवारी 8, 2018 रोजीच्या निर्देशांची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी, वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आली आहे.

ठेवीदारांच्या अडचणी/त्रास कमी करण्याच्या दृष्टीने वरील शिथीलीकरण करण्यात आले असून, त्याचा अर्थ वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा किंवा घट झाल्याचे समजण्यात येऊ नये. परिस्थितीवर अवलंबून वरील निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1897

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä