जानेवारी 16, 2018
निर्देश परत घेणे - दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35अ खाली, दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल ह्यांना, निर्देश दि. मार्च 28, 2014 अन्वये निर्देश दिले होते. जारी करण्यात आलेल्या निर्देशांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती व बदल करण्यात आले होते. त्यातील शेवटची मुदतवाढ निर्देश दि. जून 29, 2017 अन्वये जानेवारी 6, 2018 पर्यंत दिलेली होती.
जनतेच्या हितासाठी तसे करणे आवश्यक असल्याबाबत तिचे समाधान झाले असल्याने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35अ च्या पोटकलम (2) मध्ये तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँक, दि सुरी फ्रेंड्स युनियन को-ऑपरेटिव बँक लि., सुरी, पश्चिम बंगाल ह्यांना देण्यात आलेले निर्देश, जानेवारी 6, 2018 पासून मागे घेत आहे. तथापि वरील बँक कार्यकारी सूचनांखाली असणे सुरुच राहील.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1946 |