जानेवारी 17, 2018
निरनिराळ्या डिझाईनच्या रु.10 च्या नाण्यांच्या वैध चलन स्थितीबाबत आरबीआयचे पुनर्निवेदन भारतीय रिझर्व बँकेच्या नजरेस आले आहे की, काही ठिकाणी, दुकानदार तसेच जनता, रु.10 ची नाणी स्वीकारण्यास, नाण्यांच्या खरेपणाविषयी शंका आल्यानेच हयगय करतात.
येथे स्पष्ट करण्यात येते की, भारतीय रिझर्व बँक टाकसाळीत तयार केलेली नाणीच प्रसृत करते व ह्या टाकसाळी भारत सरकारच्याच अधिकाराखाली असतात. ह्या नाण्यांवर निरनिराळी आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये दर्शविणारी स्पष्ट लक्षणे असून, ती नाणी वेळोवेळी प्रसृत केली जातात.
नाण्यांचे आयुष्य दीर्घकालीन असल्याने, निरनिराळ्या डिझाईन्सची व मूल्याची नाणी एकाच वेळी परिवलित होत असतात. रिझर्व बँकेने आतापर्यंत, 14 डिझाईन्समधील रु.10 ची नाणी दिली असून, त्यांच्या स्पष्ट लक्षणांबाबत जनतेला वृत्तपत्र निवेदनांमार्फत कळविण्यातही आले आहे (सोबत यादी दिली आहे). ही सर्व नाणी वैध चलन असून ती व्यवहारांमध्ये स्वीकारता येऊ शकतात.
भारतीय रिझर्व बँकेने भूतकाळात, एक वृत्तपत्र निवेदन (नोव्हेंबर 20, 2016) देऊन, रु.10 मूल्याची नाणी, सर्व व्यवहारांमध्ये कोणतीही हयगय न करता, वैध चलन म्हणून स्वीकारण्याची विनंती जनतेला केली होती.
रिझर्व बँकेने बँकांनाही सांगितले आहे की, त्यांनी त्यांच्या सर्व शाखांमध्येही व्यवहार व विनियमासाठी ही नाणी स्वीकारावीत.
ह्या नाण्यांवरील अधिक माहितीसाठी कृपया पुढील लिंकला भेट द्या - https://www.rbi.org.in/Scripts/BS_PressReleaseDisplay.aspx
अनुक्रमांक |
देण्याची तारीख |
वृत्तपत्र निवेदने |
1 |
जून 29, 2017 |
श्रीमद् राजचंद्र ह्यांच्या 150 व्या जयंती स्मृत्यर्थ रु.10 चे नाणे प्रसृत |
2 |
एप्रिल 26, 2017 |
नॅशनल आर्काइव्हज् ऑफ इंडियाच्या ‘एकशे पंचवीसाव्या स्मरणार्थ’ रु.10 ची नाणी प्रसृत. |
3 |
जून 22, 2016 |
स्वामी चिन्मयानंदांच्या शंभराव्या जयंती स्मरणार्थ, आरबीआय लवकरच रु.10 ची नाणी प्रसृत करणार. |
4 |
जानेवारी 28, 2016 |
डॉ. बी आर आंबेडकर ह्यांच्या 125 व्या जयंती स्मरणार्थ रु.10 ची नाणी प्रसृत. |
5 |
जुलै 30, 2015 |
‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ स्मरणार्थ रु.10 ची नाणी प्रसृत. |
6 |
एप्रिल 16, 2015 |
महात्मा गांधीच्या दक्षिण आफ्रिकेतून पुनरागमनाला 100 वर्षे झाल्याच्या स्मरणार्थ रु.10 ची नाणी प्रसृत. |
7 |
जुलै 17, 2014 |
‘कॉईर बोर्डाच्या हीरक जयंती स्मरणार्थ’ रु.10 ची नाणी प्रसृत. |
8 |
ऑगस्ट 29, 2013 |
‘श्री माता वैष्णोदेवी मंदिराच्या मंडळाच्या रजत जयंती’ स्मरणार्थ रु.10 ची नाणी प्रसृत. |
9 |
जून 14, 2012 |
‘भारताच्या संसदेला 60 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ’ रु.10 ची नाणी प्रसृत. |
10 |
जुलै 22, 2011 |
नाण्यांची नवीन मालिका प्रसृत. |
11 |
एप्रिल 01, 2010 |
पीएम कडून स्मृतीप्रीत्यर्थचा नाणी संच वितरित. एफएम कडून : मिंट रोड, माईलस्टोन्स : आरबीआय 75 वर्षांची : वितरित. |
12 |
फेब्रुवारी 11, 2010 |
‘होमी भाभा जन्मशताब्दी’ स्मरणार्थ रु.10 ची (बायमेटॉलिक) नवीन नाणी प्रसृत. |
13 |
मार्च 26, 2009 |
‘विविधतेमध्ये एकता’ ह्या विषयावरील रु.10 ची नवीन नाणी (बायमेटॉलिक) प्रसृत. |
14 |
मार्च 26, 2009 |
‘कनेक्टिविटी अँड इन्फरमेशन टेक्नॉलॉजी’ ह्या विषयावरील र.10 ची नवीन नाणी (बायमेटॉलिक) प्रसृत. |
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1950 |