जानेवारी 22, 2018
मे. रामके फायनान्स अँड इनवेस्टमेंट्स (प्रा.) लि. ह्यांना आरबीआयकडून वित्तीय दंड लागु
भारतीय रिझर्व बँक अधिनियम 1934 च्या (आरबीआय अधिनियम 1934) कलम 58ब च्या पोटकलम (5) च्या खंड (अअ) सह वाचित, कलम 58ग च्या पोट कलम (1) च्या खंड (ब) खाली, भारतीय रिझर्व बँकेने, मे. रामके फायनान्स अँड इनवेस्टमेंट्स (प्रा.) लि. (ती कंपनी) ह्यांचेवर, आरबीआयने वेळोवेळी दिलेल्या निर्देश/आदेशांचे अनुपालन त्या कंपनीने केले नसल्याकारणाने रु.1 लाख दंड लागु केला आहे.
पार्श्वभूमी
मे. रामके फायनान्स अँड इनवेस्टमेंट्स (प्रा.) लि. ह्यांनी, आरबीआयची पूर्व मंजुरी न घेताच तिचे नाव, 31 मार्च 2016 पासून, मे. रामके आयडब्ल्युएम प्रायव्हेट लि. असे बदलले आहे व त्यामुळे, आरबीआयने, जानेवारी 13, 2000 रोजी दिलेल्या परिपत्रकातील परिच्छेद 5 चे उल्लंघन झाले आहे. दंड लागु करण्यासाठी वरील कंपनीला जानेवारी 20, 2017 रोजी कारणे दाखवा नोटिस (एससीएन) देण्यात आली होती. त्यावर त्या कंपनीने दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याचे समजण्यात आले. ऑगस्ट 16, 2017 रोजी, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 58 ग च्या पोटकलम (2) खाली, त्या कंपनीला वैय्यक्तिक सुनावणीची संधीही देण्यात आली होती. ह्या प्रकरणातील सर्व सत्य, त्या कंपनीने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी दरम्यान दिलेले सादरीकरण विचारात घेऊन आरबीआयने निष्कर्ष काढला की उल्लंघन झाले असून त्यासाठी त्या कंपनीला दंड लागु करणे आवश्यक आहे. त्यानुसार वरील कंपनीवर रु.1 लाख दंड लागु करण्यात आला आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2002
|