Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (101.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 01/02/2018
सिरसिला को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., सिरसिला, तेलंगणा - ह्यांचेवर दंड लागु.

फेब्रुवारी 1, 2018

सिरसिला को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., सिरसिला, तेलंगणा - ह्यांचेवर दंड लागु.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46 (4) सह वाचित, कलम 47 अ (1)(ब) ने तिला दिलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि सिरसिला को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., सिरसिला, तेलंगणा ह्यांना रु.0.50 लाख (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला असून, तो दंड, एक्सपोझर नॉर्म्स/इतर निर्बंध, व तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) नॉर्म्स/अँटी मनी लाँडरिंग (एएमएल) मेझर्स ह्याबाबत रिझर्व बँकेने दिलेले आदेश व मार्गदर्शक तत्वे ह्यांचे उल्लंघन केल्या गेल्याने लावण्यात आला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने, वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य बाबी व बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निष्कर्ष काढला की उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2094

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä