फेब्रुवारी 8, 2018
फिन-टेक व डिजिटल बँकिंगवरील आंतर-विनियामक कार्य-गटाचा अहवाल
भारतीय रिझर्व बँकेकडून, आज तिच्या वेबसाईटवर, भारतामधील फिन-टेक व डिजिटल बँकिंग वरील आंतर-विनियामक कार्य गटाचा अहवाल प्रदर्शित करण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
भारतामधील फिनटेक व डिजिटल बँकिंग संबंधीच्या संपूर्ण विनियामक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) एक आंतर-विनियामक कार्य गट स्थापन केला होता (अध्यक्ष : श्री. सुदर्शन सेन, कार्यकारी संचालक, आरबीआय)
ह्या समितीमध्ये, भारतीय रिझर्व बँक, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी), इन्शुअरन्स रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया (आय आर डीएआय) पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेवलपमेंट ऑथोरिटी (पीएफआरडीए), नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि निवडक बँका व एक रेटिंग एजन्सी ह्यासारख्या वित्तीय क्षेत्रातील सर्व विनियमकांचे प्रतिनिधी समाविष्ट होते.
ह्या अहवालावरील मते व सूचना ई-मेल किंवा टपालाने, सीजीएम-इन-चार्ज, बँकिंग विनियम विभाग, भारतीय रिझर्व बँक, केंद्रीय कार्यालय, शहीद भगतसिंग मार्ग, मुंबई - 400001 ह्यांचेकडे फेब्रुवारी 28, 2018 पर्यंत पाठविण्यात याव्यात.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2163 |