फेब्रुवारी 14, 2018
भारतामध्ये बँकिंग व्यवसाय करण्यासाठीच्या परवान्याचे रद्दीकरण आणि बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या
(सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 22 व 36 अ (2) खाली, नागरिक सहकारी बँकेचे एका सहकारी
सोसायटीमध्ये रुपांतरण - शेर नागरिक सहकारी बँक लि., जबलपुर (मध्यप्रदेश) शेर नागरिक सहकारी बँक लि., जबलपुर (मध्यप्रदेश) ह्यांनी, त्या बँकेचे स्वेच्छेने एका सहकारी क्रेडिट सोसायटीमध्ये रुपांतरण करुन तिला एक अबँकीय संस्था म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव भारतीय रिझर्व बँकेकडे सादर केला. वरील बँकेने, ह्या अधिनियमाच्या कक्षेत न येण्यासाठी/बाहेर पडण्यासाठी, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (एएसीएस) (हा अधिनियम) कलम 36अ(2) मध्ये देण्यात आलेल्या आवश्यकता पूर्ण केल्या आहेत.
जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, भारतीय रिझर्व बँकेने, शेर नागरिक सहकारी बँक, जबलपुर (मध्यप्रदेश) ह्यांचा बँकिंग परवाना, दि. फेब्रुवारी 8, 2018 रोजीच्या आदेशान्वये रद्द केला आहे. त्यानुसार वरील बँक, ह्या अधिनियमाच्या कलम 56 सह वाचित कलम 5 (सीसीआय) मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे, एक ‘सहकारी बँक’ असणे समाप्त झाले असून, ह्या अधिनियमाच्या सर्व तरतुदीही वरील सहकारी बँकेला लागु होणे समाप्त झाले आहे. ह्या अधिनियमाच्या कलम 56 सह वाचित, कलम 22 खाली ह्या बँकेला भारतामध्ये बँक-व्यवसाय करण्यास मनाई आहे. त्यामुळे सार्वजनिक ठेवींचा स्वीकार/परतफेड करण्यासह, वरील बँकेला, ह्या अधिनियमाच्या कलम 5 (ब) मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार ‘बँकिंग’ चा व्यवसाय करण्यास प्रतिबंध आहे.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2195 |