Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (102.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 20/02/2018
बेडकीहाळ अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बेडकीहाळ, कर्नाटक ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु

फेब्रुवारी 20, 2018

बेडकीहाळ अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बेडकीहाळ, कर्नाटक ह्यांचेवर आरबीआयकडून दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ (1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, बेडकीहाळ अर्बन को-ऑपरेटिव बँक लि., बेडकीहाळ, कर्नाटक ह्यांचेवर, भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या एक्सपोझर नॉर्म्सवरील निर्देशांचे/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबाबत, रु.1,00,000/- (रुपये एक लाख) दंड लागु केला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने वैय्यक्तिक सुनावणी मागितली होती. ह्या प्रकरणातील सत्य, वरील बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी विचारात घेऊन, रिझर्व बँकेने निर्णय घेतला की, उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2239

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä