फेब्रुवारी 23, 2018
अबँकीय वित्तीय कंपन्यांसाठी रिझर्व बँकेकडून लोकपाल योजनेची सुरुवात
फेब्रुवारी 7, 2018 च्या नाणेविषयक धोरण निवेदनात घोषित केल्यानुसार, आरबीआय अधिनियम 1934 च्या कलम 45-आयए खाली पंजीकृत झालेल्या एनबीएफसीं विरुध्दच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) अधिसूचना दि. फेब्रुवारी 23, 2018 अन्वये, आज, अबँकीय वित्तीय कंपन्यांसाठी (एनबीएफसी) लोकपाल योजना सुरु केली आहे. ह्या योजनेखाली असलेल्या एनबीएफसींनी दिलेल्या सेवांमधील त्रुटी संबंधाने असलेल्या तक्रारींचे निःशुल्क व त्वरित निराकरण ही योजना उपलब्ध करुन देईल. एनबीएफसी लोकपालांची कार्यालये चार महानगरात म्हणजे, चेन्नई, कोलकाता, मुंबई व नवी दिल्ली येथे असतील. आणि संबंधित क्षेत्रातील ग्राहकांच्या तक्रारी हाताळतील.
सुरुवातीला ही योजना, ठेवी स्वीकारणा-या सर्व एनबीएफसींसाठी असेल. प्राप्त झालेल्या अनुभवाच्या आधारावर, आरबीआय ही योजना, रु. 1 बिलियन व त्यापेक्षा अधिक मालमत्ता असलेल्या एनबीएफसींना, कस्टमर इंटरफेस सह लागु करील.
ह्या योजनेत अॅपेलेट यंत्रणाही ठेवण्यात आली असून, त्याखाली, ग्राहक/एनबीएफसी ह्यांना, लोकपालाने दिलेल्या निवाड्याविरुध्द अॅपेलेट प्राधिकरणाकडे अपील करण्यास पर्याय उपलब्ध असेल.
ही संपूर्ण योजना आरबीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2289 |