Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (105.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 27/02/2018
दि रामकृष्ण म्युच्युअली एडेड को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., निदादावोले, आंध्र प्रदेश ह्यांना आरबीआयकडून दंड लागु

फेब्रुवारी 27, 2018

दि रामकृष्ण म्युच्युअली एडेड को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., निदादावोले, आंध्र प्रदेश ह्यांना आरबीआयकडून दंड लागु

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ (1)(ब) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, दि रामकृष्ण म्युच्युअली एडेड को-ऑपरेटिव अर्बन बँक लि., निदादावोले, आंध्र प्रदेश ह्यांचेवर, भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या संचालक व त्यांचे नातेवाईक ह्यांना कर्जे व अग्रिम राशी देण्यावरील निर्देशांचे/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबाबत, रु.1.00 लाख (रुपये एक लाख) दंड लागु केला आहे.

भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी ह्यांना विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निर्णय घेतला की, उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.

अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2302

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä