फेब्रुवारी 27, 2018
दि कुप्पम को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., कुप्पम, आंध्र प्रदेश ह्यांना दंड लागु
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या (सहकारी सोसायट्यांना लागु असलेला) कलम 46(4) सह वाचित कलम 47 अ (1)(ब्) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँकेने, दि कुप्पम को-ऑपरेटिव टाऊन बँक लि., कुप्पम, आंध्र प्रदेश ह्यांचेवर, भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या संचालक व त्यांचे नातेवाईक ह्यांना कर्जे व अग्रिम राशी देण्यावरील निर्देशांचे/मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन केल्याबाबत, रु. 0.50 लाख (रुपये पन्नास हजार) दंड लागु केला आहे.
भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेला एक कारणे दाखवा नोटिस पाठविली होती व त्यावर त्या बँकेने लेखी उत्तर सादर केले होते. ह्या प्रकरणातील सत्य, बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी ह्यांना विचारात घेऊन भारतीय रिझर्व बँकेने निर्णय घेतला की, उल्लंघने झाली असून त्यासाठी दंड लावणे आवश्यक आहे.
अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2300 |