फेब्रुवारी 28, 2018
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35अ खालील
निर्देश - दि मराठा सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र
दि मराठा सहकारी बँक लि., मुंबई, महाराष्ट्र ह्यांना, निर्देश दि. ऑगस्ट 31, 2016 अन्वये, ऑगस्ट 31, 2016 रोजी व्यवहार बंद झाल्यापासून निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर देण्यात आलेल्या निर्देशांन्वये, वरील निर्देशांची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती. त्यातील शेवटचा निर्देश ऑगस्ट 28, 2017 रोजीचा असून त्याची वैधता, पुनरावलोकनाच्या अटींवर फेब्रुवारी 28, 2018 पर्यंत होती.
जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35 अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, भारतीय रिझर्व बँक निर्देश देत आहे की, वरील बँकेला वेळोवेळी सुधारित करण्यात आलेले ऑगस्ट 31, 2016 रोजी दिलेले, व फेब्रुवारी 28, 2018 पर्यंत शेवटून वैधता वाढविण्यात आलेले निर्देश, वरील बँकेला, पुनरावलोकनाच्या अटीवर, आणखी सहा महिन्यांसाठी, म्हणजे मार्च 1, 2018 ते ऑगस्ट 31, 2018 पर्यंत निर्देश दि. फेब्रुवारी 26, 2018 अन्वये लागु असतील.
फेब्रुवारी 26, 2018 च्या निर्देशांची एक प्रत, जनतेच्या माहितीसाठी वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व बँकेने दिलेली वरील मुदतवाढ/बदल ह्याचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असल्याबाबत भारतीय रिझर्व बँकेचे समाधान झाले आहे असा घेण्यात येऊ नये.
अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2324 |