मार्च 5, 2018
इंडियन ओव्हरसीज बँकेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
भारतीय रिझर्व बँकेने, फेब्रुवारी 27, 2018 रोजी, इंडियन ओव्हरसीज बँक (ती बँक) ह्यांचेवर, त्यांनी, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) बाबत आरबीआयने दिलेले सूचनांचे पालन न केल्याबद्दल रु. 20 दशलक्ष आर्थिक दंड लागु केला आहे. आरबीआयने दिलेल्या वरील सूचना/मार्गदर्शक तत्वांचे, वरील बँकेने पालन केले नसल्याचे विचारात घेऊन, वरील दंड, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(1) सह वाचित कलम 47अ(1)(क) मधील तरतुदींखाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन लावण्यात आला आहे.
ही कारवाई, त्या बँकेच्या विनियामक अनुपालनांमधील त्रुटींवर आधारित असून, त्या बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्या वैधतेशी संबंधीत नाही.
पार्श्वभूमी
इंडियन ओव्हरसीज बँकेच्या एका शाखेत एक फसवणुक/अफरातफर आढळून आली. त्या बँकेच्या अंतर्गत तपासणी रिपोर्टसह कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर, इतर बाबींसह, आरबीआयने, तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) संबंधाने आरबीआयने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याचे आढळून आले. ह्या कागदपत्रांवर आधारित, वरील बँकेला एक नोटिस देण्यात आली व आरबीआयने दिलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल त्या बँकेला दंड का करण्यात येऊ नये ह्याची कारणे देण्यात सांगण्यात आले होते. त्यावर त्या बँकेने दिलेले उत्तर, वैय्यक्तिक सुनावणीमध्ये सादर केलेली मौखिक व लेखी सादरीकरणे तसेच सादर केलेली अतिरिक्त माहिती व कागदपत्रे विचारात घेऊन, आरबीआयने निर्णय घेतला की, आरबीआयने दिलेल्या सूचना/मार्गदर्शक तत्वे ह्यांचे पालन न केल्याबाबतचे वरील आरोप सत्य असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2355
|