मार्च 8, 2018
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. ह्यांचेवर भारतीय रिझर्व बँकेकडून आर्थिक दंड लागु
भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) मार्च 1, 2018 रोजी, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. (ती बँक), ह्यांचेवर आरबीआयने घातलेल्या लायसेन्सिंग संबंधीची एक अट पूर्ण न केल्याबद्दल रु. दहा लाख दंड लागु केला आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(1) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खाली देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन हा दंड लावण्यात आला आहे.
ही कारवाई, विनियामक अनुपालनांमधील त्रुटींवर आधारित असून तिचा संबंध, वरील बँकेने तिच्या ग्राहकांबरोबर केलेल्या व्यवहारांशी किंवा करारांशी नाही.
पार्श्वभूमी
आरबीआयकडून पूर्व मंजुरी घेताच, वरील बँकेने, म्युच्युअल फंड युनिट्स, पेन्शन उत्पाद, इंशुअरंस उत्पाद आणि पोर्ट फोलियो मॅनेजमेंट सेवा देण्यास सुरुवात केली असल्याचे कळविण्यात आले. मिळालेली माहिती व इतर संबंधित कागदपत्रे ह्यांच्या आधारावर जानेवारी 18, 2018 दिनांकित एक नोटिस वरील बँकेला देण्यात आली, आणि त्या बँकेला बँकिंग परवाना देते वेळीच भारतीय रिझर्व बँकेने, लायसेन्सिंगसाठी घातलेल्या अटी, त्या बँकेने पूर्ण न केल्यामुळे तिला दंड का करण्यात येऊ नये ह्याची कारणे देण्यास सांगण्यात आले होते. वरील बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणी केलेली मौखिक सादरीकरणे विचारात घेऊन आरबीआयने निर्णय घेतला की, आरबीआयने घातलेल्या अटींपैकी एका अटीचे पालन न केल्याबाबतचा आरोप सिध्द होत असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2395 |