मार्च 9, 2018
एअरटेल पेमेंट्स बँक लि. ह्यांचेवर आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
भारतीय रिझर्व बँकेने, मार्च 7, 2018 रोजी, एअरटेल पेमेंट्स बँक लि. (ती बँक) ह्यांचेवर पेमेंट्स बँकांसाठीची मार्गदर्शक तत्वे व तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) वरील आरबीआयने दिलेल्या सूचनांचे उल्लंघन/भंग केला असल्याने रु. 50 दशलक्ष आर्थिक दंड लागु केला आहे. आरबीआयने वरील मार्गदर्शक तत्वे/सूचनांचे अनुपालन न केल्याचे विचारात घेऊन बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(1) सह वाचित, कलम 47अ (1)(क) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने हा दंड लागु केला आहे.
ही कारवाई, विनियामक अनुपालनाच्या अटींवर आधारित असून, वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेले व्यवहार किंवा करार ह्यांच्या वैधतेशी संबंधित नाही.
पार्श्वभूमी
ग्राहकांची स्पष्ट/विशिष्ट संमती घेतल्याशिवायच वरील बँकेने ग्राहक खाती उघडली असल्याबाबतच्या तक्रारी व माध्यमांमधील विपरीत अहवाल ह्यावर आधारित, आरबीआयने नोव्हेंबर 20 व 22, 2017 दरम्यान वरील बँकेला पर्यवेक्षकीय भेट दिली. ह्या पर्यवेक्षकीय भेटीचा अहवाल आणि संबंधित इतर कागदपत्र ह्यावरुन इतर बाबींसह दिसून आले की, वरील बँकेने आरबीआयने दिलेल्या, ‘पेमेंट्स बँकांसाठीची कार्यकारी मार्गदर्शक तत्वे’ व तुमचा ग्राहक जाणा (केवायसी) नॉर्म्सचे वरील बँकेकडून उल्लंघन झाले आहे. वरील कागदपत्रांच्या आधारावर वरील बँकेला, जानेवारी 15, 2018 रोजी एक नोटिस देण्यात आली आणि आरबीआयने दिलेल्या सूचना व मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याबाबत वरील बँकेला दंड का लावण्यात येऊ नये ह्याची कारणे देण्यास सांगण्यात आले होते. त्यावर वरील बँकेने दिलेले उत्तर व वैय्यक्तिक सुनावणीमध्ये दिलेले मौखिक सादरीकरण विचारात घेऊन आरबीआयने निर्णय घेतला की, आरबीआयने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे/सूचनांचे अनुपालन न केल्याचा आरोप सिध्द होत असून त्यासाठी आर्थिक दंड लावणे आवश्यक आहे.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2410 |