मार्च 14, 2018
बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ खालील
निर्देश - सन्मित्र सहकारी बँक मर्यादित, मुंबई, महाराष्ट्र
सन्मित्र सहकारी बँक मर्यादित, मुंबई, महाराष्ट्र ह्यांना जून 14, 2016 रोजीच्या निर्देशान्वये, जून 14, 2016 रोजीचे व्यवहार समाप्त झाल्यापासून, सहा महिन्यांसाठी निर्देशांखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर देण्यात आलेल्या निर्देशान्वये, वरील निर्देशाची वैधता वेळोवेळी वाढविण्यात आली होती आणि शेवटचा निर्देश सप्टेंबर 8, 2017 अन्वये ती वैधता, पुनरावलोकनाच्या अटीवर, मार्च 14, 2018 पर्यंत वाढविण्यात आली होती.
जनतेच्या माहितीसाठी येथे अधिसूचित करण्यात येते की, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन भारतीय रिझर्व बँक निर्देश देत आहे की, सन्मित्र सहकारी बँक मर्यादित, मुंबई, महाराष्ट्र ह्यांना जून 14,2016 रोजीच्या निर्देशान्वये देण्यात आलेले, वेळोवेळी सुधारित केलेले व सप्टेंबर 8, 2017 रोजीच्या निर्देशान्वये, मार्च 14, 2018 पर्यंत शेवटून वैधता वाढविण्यात आलेले निर्देश, मार्च 9, 2018 रोजीच्या निर्देशान्वये, पुनरावलोकनाच्या अटीवर, आणखी चार महिन्यांसाठी, म्हणजे मार्च 15, 2018 ते जुलै 14, 2018 पर्यंत लागु असतील.
वेळोवेळी सुधारित केलेल्या वरील निर्देशामधील इतर अटी व शर्तींमध्ये कोणताही बदल नाही.
वरील बदल असलेल्या, मार्च 9, 2018 च्या निर्देशाची एक प्रत जनतेच्या माहितीसाठी, वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.
भारतीय रिझर्व बँकेने केलेल्या वरील बदलाचा अर्थ, वरील बँकेच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे असा लावण्यात येऊ नये.
अनिरुध्द डी जाधव
सहाय्यक व्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2446 |