आयसीआयसीआय बँक लि. ह्यांना आरबीआयकडून आर्थिक दंड लागु |
मार्च 29, 2018
आयसीआयसीआय बँक लि. ह्यांना आरबीआयकडून आर्थिक दंड लागु
मार्च 26, 2018 च्या आदेशान्वये, भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) आयसीआयसीआय बँक लि. (ती बँक) ह्यांचेवर रु.589 दशलक्ष आर्थिक दंड लागु केला असून तो दंड, तिच्या एचटीएम पोर्ट फोलियोमधून सिक्युरिटींची थेट विक्री करते व त्याबाबत विशिष्ट प्रकटीकरण देणे ह्याबाबत आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याने लावण्यात आला आहे. आरबीआयने दिलेल्या वरील निर्देशांचे/मार्गदर्शक तत्वांचे पालन न केले असल्याने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 46(4)(1) सह वाचित, कलम 47अ(1)(क) खालील तरतुदींनी तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन आरबीआयने हा दंड लागु केला आहे.
ही कारवाई, विनियामक अनुपालनांमधील त्रुटींवर आधारित असून, त्याचा संबंध वरील बँकेने तिच्या ग्राहकांशी केलेल्या करांराशी किंवा व्यवहारांशी नाही.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2593 |
|