जियो पेमेंट्स बँक लि. ह्यांचेकडून कार्यकृतींचा प्रारंभ |
एप्रिल 3, 2018
जियो पेमेंट्स बँक लि. ह्यांचेकडून कार्यकृतींचा प्रारंभ
एप्रिल 3, 2018 पासून, जियो पेमेंट्स बँक लि. ह्यांनी एक पेमेंट्स बँक म्हणून कार्यकृती करण्यास प्रारंभ केला आहे. भारतामध्ये पेमेंट्स बँकेचा व्यवसाय करण्यास, भारतीय रिझर्व बँकेने, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 22(1) खाली वरील बँकेला परवाना दिला आहे.
ऑगस्ट 19, 2015 रोजीच्या वृत्तपत्र निवेदनात घोषित केल्यानुसार, एक पेमेंट्स बँक स्थापन करण्यासाठी तत्वतः मंजुरी देण्यात आलेल्या 11 अर्जदारांमध्ये, रिलायन्स इंडस्ट्रीज लि., मुंबई ही कंपनी होती.
जोस जे कत्तूर
मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2617 |
|