एप्रिल 17, 2018
कोणताही चलन-तुटवडा नसल्याचे आरबीआयकडून स्पष्टीकरण
माध्यमांच्या एका क्षेत्रामध्ये कळविण्यात आले/येत आहे की देशाच्या काही प्रदेशात चलन तुटवडा आहे. सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात येते की आरबीआयच्या तिजो-यांमध्ये व धनकोषांमध्ये पुरेशी रोकड आहे. तरीही चारही नोट छापखान्यांमध्ये नोटांची छपाई वाढविण्यात आली आहे.
एटीएम्समध्ये वारंवार पैसे भरण्यासाठीचे परिवलन प्रश्न आणि एटीएम्सचे पुनश्च कॅलिब्रेशन अजूनही केले जात असल्याने काही ठिकाणी तुटवडा जाणवू शकतो. ह्या दोन्हीही बाबींवर आरबीआय जवळून देखरेख ठेवून आहे.
ह्याशिवाय, सावधानतेची एक बाब म्हणून, खूप मोठ्या प्रमाणात रोख रकमांच्या निकासी केल्या जात असलेल्या क्षेत्रात चलन पाठविण्यासाठी आरबीआय पावले उचलीत आहे.
जोस जे कत्तूर मुख्य महाव्यवस्थापक
वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/2758
SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä