Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (98.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 16/05/2018
वसंतदादा नागरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद, महाराष्ट्र ह्यांना मुदतवाढ

मे 16, 2018

वसंतदादा नागरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद, महाराष्ट्र ह्यांना मुदतवाढ

भारतीय रिझर्व बँकेने, जनतेच्या हितासाठी, वसंतदादा नगरी सहकारी बँक लि., उस्मानाबाद, महाराष्ट्र ह्यांना, बँकिंग विनियामक अधिनियम 1949 (एएसीएस) च्या कलम 35 अ च्या पोट कलम (1) खाली तिला देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, नोव्हेंबर 13, 2017 रोजीच्या व्यवहार बंद झाल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी निर्देश दिले होते. भारतीय रिझर्व बँकेने आता, ह्या निर्देशांना आणखी सहा महिन्यांची, म्हणजे मे 14, 2018 ते नोव्हेंबर 13, 2018 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ह्या निर्देशान्वये, ठेवींचा स्वीकार/निकासीवर काही निर्बंध आणि/किंवा मर्यादा घालण्यात आल्या आहेत. संबंधित जनतेच्या माहितीसाठी सविस्तर निर्देश वरील बँकेच्या कार्यालयात प्रदर्शित करण्यात आले आहेत. भारतीय रिझर्व बँक, परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशांमध्ये बदल करण्याचा विचार करु शकते. हे निर्देश देण्यात आले ह्याचा अर्थ, रिझर्व बँकेने वरील बँकेचा बँकिंग परतावा रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक, तिचे व्यवहार निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3007

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä