Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (107.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 19/05/2018
शिवम सहकारी बँक लि., इचलकरंजी, जिल्हा-कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून निर्देश लागु

मे 19, 2018

शिवम सहकारी बँक लि., इचलकरंजी, जिल्हा-कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना आरबीआयकडून निर्देश लागु

भारतीय रिझर्व बँकेने (निर्देश डीसीबीएस.सीओ.बीएसडी-आय/डी-6/12.22.351/2017-18 दि. मे 18, 2018 अन्वये) शिवम सहकारी बँक लि., इचलकरंजी, जिल्हा-कोल्हापुर, महाराष्ट्र ह्यांना निर्देशांखाली ठेवले आहे. ह्या निर्देशांनुसार, आरबीआयने दिलेल्या निर्देशांच्या अटींवर ठेवीदारांना त्यांच्या प्रत्येक बचत किंवा चालु खाते किंवा अन्य कोणतेही नाव असलेल्या खात्यामधील एकूण शिल्लक रकमेमधून रु.1,000 (रुपये एक हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी आहे. शिवम सहकारी बँक लि., इचलकरंजी, जिल्हा-कोल्हापुर, भारतीय रिझर्व बँकेची लेखी पूर्व-मंजुरी घेतल्याशिवाय, कोणतीही नवीन कर्जे किंवा अग्रिम राशी देऊ शकणार नाही किंवा नूतनीकृत करु शकणार नाही, कोणतीही गुंतवणुक करु शकणार नाही, निधी कर्जाऊ घेणे व नवीन ठेवी घेणे ह्यासह कोणतीही नवीन जबाबदारी घेऊ शकणार नाही, तिचे दायित्व किंवा जबाबदारी म्हणून प्रदान करणार नाही किंवा प्रदान करण्यास राजी दर्शविणार नाही, कोणत्याही प्रकारची तडजोड किंवा करार करुन, आरबीआयच्या मे 18, 2018 च्या निर्देशांमध्ये अधिसूचित केलेल्या बाबी/मालमत्ता सोडल्यास, तिची कोणतीही मालमत्ता विकणार नाही, हस्तांतरित करणार नाही किंवा अन्यथा वासलात लावू शकणार नाही. हे निर्देश, मे 19, 2018 रोजीचे व्यवहार बंद झाल्यावर देण्यात आले आहेत.

भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या ह्या निर्देशांचा अर्थ, रिझर्व बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत, ती बँक तिचे बँकिंग व्यवहार निर्बंधांसह करणे सुरु ठेवू शकते. परिस्थितीवर अवलंबून ह्या निर्देशात बदल करण्याचा विचार रिझर्व बँक करु शकते.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 35 अ चा पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन हे निर्देश लागु करण्यात आले आहेत. संबंधित जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3045

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä