Download
the marathi
font
 
   आमच्याबद्दल     उपयोगी माहिती     वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न     आर्थिक शिक्षण     तक्रारी     इतर दुवे 
½þÉä¨É >> |ÉäºÉ ‡®ú±ÉÒVÉäºÉ - Display
Note : To obtain an aligned printout please download the (101.00 kb ) version to your machine and then use respective software to print the story.
Date: 28/05/2018
रुपी को-ऑपरेटिव बँक लि., पुणे ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून मुदतवाढ

मे 28, 2018

रुपी को-ऑपरेटिव बँक लि., पुणे ह्यांना दिलेल्या निर्देशांना आरबीआयकडून मुदतवाढ

भारतीय रिझर्व बँकेने, रुपी को-ऑपरेटिव बँक लि., पुणे, महाराष्ट्र ह्यांना दिलेल्या निर्देशांना (निर्देश डीसीबीआर.सीओ.एआयडी/ डी-42/12.22.218/2017-18 दि. मे 23, 2018 अन्वये) जून 1, 2018 पासून ऑगस्ट 31, 2018 पर्यंत अशी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ पुनरावलोकनाच्या अटीवर दिली आहे. हे निर्देश सुरुवातीला फेब्रुवारी 22, 2013 ते ऑगस्ट 21, 2013 पर्यंत देण्यात आले होते आणि त्यांना आठ वेळा प्रत्येक सहा महिन्यांची व चार वेळा प्रत्येकी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. शेवटची मुदतवाढ नोव्हेंबर 22, 2017 ते मे 31, 2018 अशी सहा महिन्यांसाठी होती.

बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित, कलम 35अ च्या पोटकलम (1) खाली देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन रिझर्व बँकेने हे निर्देश लागु केले होते. संबंधित जनतेच्या माहितीसाठी ह्या निर्देशांची एक प्रत वरील बँकेच्या कार्यालयात लावण्यात आली आहे.

हे निर्देश देण्यात आले ह्याच अर्थ, भारतीय रिझर्व बँकेने वरील बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे असा घेण्यात येऊ नये. वरील बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ती बँक, बँकिंग व्यवहार, निर्बंधांसह करु शकते. परिस्थितीवर अवलंबून रिझर्व बँक, ह्या निर्देशां मध्ये बदल करण्याचा विचार करु शकते.

अजित प्रसाद
सहाय्यक सल्लागार

वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/3106

 
  © ¦ÉÉ®úiÉÒªÉ ‡®úZÉ´ÉÇ ¤ÉÄEò, ºÉ´ÉÇ ½þCEò º´ÉÉvÉÒxÉ

SÉÉÆMɱªÉÉ où¹ªÉɺÉÉ`öÒ +ÉªÉ <Ç 5 ´É iªÉÉ´É®úÒ±É 1024 X 768 ‡®úZÉÉ䱪ÉÖ„ÉxÉ +ºÉÉ´Éä